Let us first understand the causes of diabetes. In Ayurveda, the main reason for explaining the cause of diabetes is asana. Here the astana means to sit. People who like to sit are more likely to have diabetes. In this it is said that people who have pleaser to sit rather than walk; they have more pleasure in lying down than walk and they have more pleasure in sleeping than ly down. This means that people with diabetes should not be sit still for long periods of time. They should rotate for 2 min after one hour. It improves their metabolic process. If they are going for a walk in the morning or evening, they should walk for 2 minutes per hour along with it.
Sitting increases the amount of fat and not working makes it useless. Therefore, the excess fat is produced and stored in the liver. When it is too late to eat, the body runs out of carbohydrates. Therefore, Liver Fat converts to Carbohydrate. This increases the carbohydrates in the body. Sitting leads to drowsiness and then sleep. Sleep increases back fat levels. This cycle continues.
मधुमेहाची कारणे आपण प्रथम समजून घेऊ . आयुर्वेदामध्ये मधुमेहाची कारण सांगतांना मुख्य कारण हे आसन सुख सांगीतले आहे. इथे आसन म्हणजे बसून राहणे. ज्या लोकांना बसुन राहण्यास आवडते त्या लोकांमधे मधुमेहाचे प्रमाण अधीक आहे. बसुन राहणे हया मध्ये असे सांगण्यात आले आहे की ज्या लोकांना चालण्यापेक्षा बसण्यात ; बसण्यापेक्षा आडव पडण्यात आणि आडव पडण्यापेक्षा झोपण्यात जास्त सुख असते त्यांना मधुमेह होतो. ह्याचाच अर्थ असा आहे की ज्या लोकांना मधुमेह आहे त्या लोकांनी जास्त वेळ एका जागेवर बसून राहु नये. त्यांनी एक तासानंतर 2 min फिरावे. त्याने त्यांचे चयापचय प्रक्रिया सुधारते. ते जर सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यास जात असतील तर त्या बरोबरच त्यांनी दर तासला 2 min चालावे.
बसून राहिल्याने मेदाचे प्रमाण वाढते व काम न केल्याने त्याचा उपयोग ही होत नाही. त्यामुळे जे जास्त प्रमाणात fat तयार होते ते Liver मध्ये जाऊन साठते. जेव्हा जेवायला उशीर होतो तेव्हा शरीरातील carbohydrate संपतात. त्यामुळे Liver Fat चे Conversion carbohydate मध्ये करते. अशाने शरीरातील carbohydrate वाढतात. बसुन राहिल्याने सुस्ती येते व नंतर झोप येते. झोपल्याने परत मेदाचे प्रमाण वाढते. हे चक्र चालूच राहते.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.