How to increase your Immunity

   We have seen that immunity depends on many factors.  Let us now see how to increase immunity.  Immunity depends on the "Ahar and Vihar".  We all know Ahar means diet and vihar is what you do.  So first we look at diet.  The diet should be nutritious for all the elements of the body.  The diet should be "Shadrasatmak" and fresh.  It must have been cooked.  In the case of cooking, I would like to say that many people are asking about eating salad.  But in Ayurveda, it is forbidden to eat food which has not been cooked.  So it is not good to eat salad.  You can only eat fruits without cooking.  This is because all fruits are "Ushnaviryatmak", meaning they digest themselves.  It does not require special cooking.  In addition, the diet should be digestible.  Don't eat too much heavy food and don't eat too much in quantity.  Do not eat too soon or in a hurry.  Full attention should be paid to the meal.  Don't eat while talking or watching TV or mobile.  Don't eat stale food.  Don't eat too many spicy foods.  If you are hungry, it is time to eat, but if you are not hungry, do not eat.  Diet should be done in a pure manner. Many people make food without taking a bath. It affects the diet. Alternatively, if we eat that food, it also affects us.

Fruits


Now we have seen a lot of rules about diet. Now we will see some rules about vihara.  I have been asked to make "Shatpavali" after the meal.  It should be done one hour after the meal.  After the meal, sit in Vajrasana.  It helps in digestion of food.  Getting up before 6 O'clock in the morning is a Vata time in which feces come automatically.  In fact, in Ayurveda, it is said to get up at the "Brahma muhurta" that is before 2-3 hr of sunrise.  But if not, get up at least 6 O'clock .  Many people exercise in the morning. One thing they should always keep in mind is that if they do not exercise only after defecation is complete, they start having constipation.  It is necessary to exercise daily.  There are two types of immunity, one is innate, we look back and the other is later developed.  It is very important to exercise every day.  If you exercise, you will never get diseases of the locomotor system.  One thing to keep in mind while exercising or doing any work is to never do any work beyond your strength.  It can strain your Respiratory system.  Do not sleep during the day.  Sleep at night.  Do not sleep for 3 hours after a meal.  When you are thirsty, drink as much water as you need.  Don't move too much in the heat or in the air.  Cover head if needed.

Cycling


Immunity म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती होय . immunity ही बराच घटकांवर अवलंबून असते ते आपण पाहिले . आता आपण immunity कशी वाढवावी हे पाहू. Immunity हे तुम्ही जो आहार विहार करता त्यावर अवलंबून असते . आहार तर आपल्या सर्वांना माहीत आहे व विहार म्हणजे तुम्ही जे आचरण करता ते होय . तर प्रथम आपण आहाराबद्दल पाहू . आहार हा शरीराच्या सर्व घटकांचे पोषण करणारा असावा . आहार हा षड्रसात्मक असावा . तो ताजा असावा . त्यावर अग्निसंस्कार झालेले असावे. अग्निच्या बाबतीत मला विशेष असे सांगायचे आहे की बरेच लोक salad खाण्याबद्दल विचारत . पण आयुर्वेदामध्ये ज्या आहारावर अग्निसंस्कार झाला नाही असा आहार घेण्यास नाकारले आहे . म्हणून salad खाणे चांगले नाही. तुम्ही अग्निसंस्कार न करता फक्त fruits खाऊ शकतात. कारण सर्व फळे ही उष्णविर्याची असतात म्हणजेच ती स्वतःच पचतात . त्यासाठी विशेष अशा अग्निची आवश्यकता नसते. त्याबरोबरच आहार हा पचणारा असावा . खूप जड पदार्थ खाऊ नये व खूप अधिक प्रमाणात जेवू ही नये . खूप लवकर किंवा घाई करत खाऊ नये . जेवतांना पुर्ण लक्ष हे जेवणावर असावे . बोलत किंवा TV mobile पाहात जेवू नये . शिळे पदार्थ खाऊ नये . खूप चमचमित पदार्थ खाऊ नये. भूक लागली की जेवावे वेळ झाली आहे पण भूक लागली नसेल तर जेवू नये. आहार हा शुद्ध होऊनच करावा बरेच जण स्नान न करता आहार बनवतात त्याचा परिणाम आहारावर होतो पर्यायाने आपण तो आहार घेतो तर आपल्यावरही होतो.

आता आपण आहाराबद्दल बरेच काही नियम पाहिले आता आपण विहाराबद्दल काही नियम पाहू. जेवण केल्यावर शतपावली करण्यास सांगितली आहे. ती जेवण झाल्यावर एक तासाने करावी . जेवण झाल्यावर वज्रासनात बसावे . त्याने आहार पचण्यास मदत होते. सकाळी 6 च्या आत उठावे तो वाताचा काळ असतो त्यात मलवेग आपोआप येतात. खरे पाहता आयुर्वेदामध्ये ब्रह्म मुहुर्तावर उठण्यास सांगितले आहे. पण जर जमत नसेल तर कमीत कमी 6 च्या आत उठावे. बरेच लोक सकाळी exercise करतात त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जर मलत्याग पुर्ण झाला असेल तरच exercise करावा नसता त्यांना constipation चा त्रास सुरु होतो. रोज exercise करणे आवश्यक आहे . immunity ही दोन प्रकारची असते एक जन्मजात ती आपण मागे पाहिली व दुसरी नंतर develope होते ती. त्यासाठी व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे त्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेच आहेत . जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्हाला locomotor systemचे आजार कधीही होणार नाहीत. व्यायाम किंवा कोणतेही काम करतांना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे आपल्या शक्ती पेक्षा कधीही जास्त कुठले काम करू नये. त्याने तुमच्या प्राणवह स्रोतसावर तान येऊ शकतो . दिवसा झोपु नये . रात्री झोपावे . जेवण झाल्यावर 3 तास झोपु नये . पाणी पितांना तहान लागल्यावर जेवढी आवश्यकता असेल तेवढेच पाणी प्यावे . खूप उनात किंवा हवेत फिरू नये . जर गरज पडल्यावर डोके झाकुण घ्यावे .

Comments

Popular posts from this blog

Quantity of Meal with respect to each person

Immunity- general view according to ayurved