Indigestion and it's type according to ayurved
Indigestion is a disorder that is affecting more and more people today. They do not digest anything they eat. Before going into details about indigestion I would like to say a few things that the indigestion we see in every patient is not the same in all. So everyone's treatment is different. Let us now look at the 3 types of indigestion that can be seen in patients.
1) In many patients, vomiting occurs with the same taste as what is eaten or with the same taste in the mouth. This means that food is not digested immediately. The reasons for this are that this can happen if the patient is lying down after the meal. At that time, the patient should take "Shatpavali" (means slowly walking) half an hour after the meal.
2) Many patients get bumps of sour juice or sour water in the mouth. In such a patient, the food is digested properly in the first stage but not in the second stage. The second stage is the hour after the meal. The reason for indigestion in this condition is to drink more water while eating. So drink half a glass of water during meal. This will stop sour bumps or sour water from coming.
3) Many people have bumps. Because their fire is slow. The patient should take less food and also take "Shatpavali" (means slowly walking) .
As mentioned above, any indigestion is different from any other indigestion. When we treat like Ayurveda. So Karuna thinks about all these things. Not all indigestion can be treated in the same way. That is why it is said that according to Ayurveda, every patient is different and their treatment is also different.
अजीर्ण हा असा बाधी आहे जो आज काल खूप जास्त लोकांना होत आहे. त्यांनी काही खाल्ले तरी पचत नाही. अजीर्णबद्दल माहिती सांगण्यापूर्वी मी काही गोष्टी सांगु इच्छिते की आपण जे अजीर्ण प्रत्येक रुग्णामध्ये पाहतो ते सर्वामध्ये सारखे नसते. त्यामुळे प्रत्येकाची चिकीत्सा ही वेगळी असते. रुग्णांमध्ये अजीर्ण 3 प्रकारचे पाहता येते ते आता आपण पाहु.
1) बराच रुग्णामध्ये जे खाल्ले त्याप्रमाणे किंवा त्याच चवीची ढेकर येते किंवा त्याच चवीचे पाणी तोंडाला येते. याचा अर्थ अन्न घेतल्याबरोबर पचत नाही. त्याची कारणे अशी असतात की रुग्ण हा जेवण झालाबरोबर आडवा पडत असेल तर असे होऊ शकते. त्यावेळी रुग्णाने जेवण झाल्यावर अर्धा तासाने शतपावली करावी.
2) बराच रुग्णामध्ये आंबट रसाच्या ढेकरा येतात किंवा तोंडला आंबट पाणी येते. अशा रुग्णामध्ये आहार पहील्या अवस्थेत व्यवस्थित पचतो परंतु दुसऱ्या अवस्थेत तो पचत नाही. दुसरी अवस्था म्हणजे जेवण झालावर तासानंतरची अवस्था होय. हा अवस्थेत अन्न न पचनाचे कारण म्हणजे जेवतांना जास्त पाणी पिणे होय. त्यामुळे अर्धाच ग्लास पाणी प्यावे. याने आंबट ढेकरा किंवा आंबट पाणी यायचे बंद होईल.
3) बराच लोकांमध्ये करपट ढेकरा येतात. कारण त्यांचा अग्नि हा मंद असतो. त्या रुग्णानी आहार कमी घ्यावा व त्यासोबतच शतपावलीही करावी.
वर जसे सांगितला प्रमाणे पाहीले तर कुठल्याही अजीर्ण हा दुसऱ्या अजीर्ण पेक्षा वेगळा आहे. जेव्हा आम्ही आयुर्वेदाप्रमाणे चिकीत्सा करतो. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करुण चिकीत्सा करतो. सर्व अजीर्णावर एकच चिकीत्सा करता येत नाही. त्यामुळेच असे म्हटले जाते की आयुर्वेदानुसार प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे व त्यांची चिकीत्साही वेगळी आहे.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.