Amala- therapeutic uses and general information
Amalki means amla. This tree is 20-25 feet high. Its leaf is like the leaf of a tadpole. It is a rectangular compound. The fruit is a small round yellowish green. Inside it is a hexagonal shaped seed.
It is a tridoshanashaka, antiseptic and is mainly used for "Pittaj"disorders. It is also very effective in treating inflammation and headaches. It is used in many urinary disorders such as urinary incontinence. Its juice is used in eye diseases. It is used for washing hair in cases of hair loss and graying. It can be used even if the intellect is weak. It is used for ailments caused by impaired sense of sight, such as poor eyesight. It is used in diseases of the digestive system such as loss of taste in the mouth, indigestion, constipation, liver disorders, acidosis, consequent, exacerbations, gastritis, hemorrhoids.
It is also used for heart disease and blood disorders. It is also used in cough, shortness of breath, tuberculosis. It is also used for reproductive disorders such as spermatogenesis, leprosy, and uterine weakness. It is also used in urinary incontinence. It is also used in many skin diseases. It is also used for fever, cravings, inflammation, weakness, decay and inflammation.
आमलकी म्हणजेच आवळा होय . हे वृक्ष असते त्याची उंची 20-25 फुट असते. ह्याची पाणी चिंचाच्या पाणा प्रमाणे असतात ति आयताकार compound असतात फुले ही छोटी पिवळ्या रंगाची असते त्याची दांडी मोठी असतात. फळ हे छोटे गोलाकार पिवळसर हिरवे असते. त्याच्या आत षट्कोण आकाराचे बीज असते.
हे त्रिदोषनाशक आहे प्रामुख्याने ह्याचा उपयोग पित्तज व्याधीवर केला जातो. तसेच दाह, शिरःशूल या व्याधीवर ही ह्याचा लेपचा खूप चांगला वापर केला जातो. अनेक मुत्राच्या व्याधी मध्ये जसे की मुत्रावरोध ह्या व्याधी मध्ये ह्याचा उपयोग होतो. डोळ्याच्या व्याधीमध्ये ह्याचा स्वरस वापरला जातो. केस गळणे व केल पांढरे होणे ह्या व्याधी मध्ये ह्याचा उपयोग केस धुण्यासाठी केला जातो. ह्याचा उपयोग बुद्धी कमजोर असेल तरी करता येतो. डोळ्याला कमी दिसणे यासारख्या इंद्रीयाच्या दुर्बलतेमुळे निर्माण होणाऱ्या व्याधीवर याचा उपयोग केला जातो. तोंडाला चव नसणे , अपचन , मलबद्धता , यकृताचे व्याधी , अम्लपित , परिणामशूल , उदावर्त , उदररोग , अर्श ह्या पचन संस्थेच्या व्याधी मध्ये ह्याचा उपयोग होतो.
हृदरोग , रक्ताचे विकार ह्यावरही ह्याचा उपयोग होतो. कास , श्वास ,राजयक्ष्मा ह्यातही ह्याचा उपयोग होतो. शुक्रमेह , प्रदर , गर्भाशय दौर्बल्य यासारख्या प्रजनन संस्थेच्या विकारावरही ह्याचा उपयोग होतो. तसेच मुत्रकृच्छामध्ये ह्याचा स्वरस वापरला जातो. अनेक प्रकारच्या त्वचारोगावरही ह्याचा उपयोग होतो . ज्वर , तृष्णा , दाह , दोबल्य , क्षय , शोथ ह्यावर ही ह्याचा उपयोग होतो.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.